अभिनेत्री मयुरी वाघ हिनं विकत घेतलं नवं घर, फोटो केले शेअर

Mayuri Wagh Buys Home: अभिनेत्री मयुरी वाघ हिनं नवं घर घेतलं आहे. सध्या तिनं आपल्या नव्या घराचे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. 

Updated: Dec 9, 2023, 08:47 PM IST
अभिनेत्री मयुरी वाघ हिनं विकत घेतलं नवं घर, फोटो केले शेअर  title=
Piyush Ranade Second Wife Mayuri Wagh Buys Home photos went viral on instagram

Mayuri Wagh New Home: अभिनेत्री मयुरी वाघ हिनं आपल्या नव्या घराचे फोटो हे सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यावेळी तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून गृहप्रवेश आणि घराच्या वास्तूशांतीचे फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी फोटो शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''माझ्या स्वप्नांच्या यादीमधील आणखी एक गोष्ट मी पूर्ण करून दाखवली आहे. माझं स्वप्न मी घराच्या रूपात साकार केलं.'' झी मराठी वाहिनीवरील अस्मिता ही तिची गाजलेली मालिका होती. या मालिकेमुळे ती घराघरात पोहचली होती. त्याचसोबत तिनं अनेक मराठी मालिकांमध्येही कामं केली आहेत. तिच्या अभिनयाचीही चर्चा असते. 

हेही वाचा : अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण

यावेळी तिनं कॅप्शन देताना नवीन घर, नवी सुरूवात, कृतज्ञता, आनंदी आयुष्य असे हॅशटॅग्सही दिले आहेत. यावेळी फोटोंतून तिच्या नव्या घराची झलक पाहायला मिळते आहे. यावेळी तिनं पिवळ्या-केशरी रंगांची सुंदर साडी परिधान केली होती. सोबतच हातात मॅंचिग बांगड्या, कानात झुमके घातले होते. यावेळी तिचा हा दिवस किती स्पेशल होता याची प्रचिती फोटोंवरून येईलच.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी तिनं दिलेल्या गोड बातमीवर नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही तिच्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मुग्धा गोडबोले, सुकन्या मोने, अमृता पवार, अश्विनी, कासार, अभिजित खांडकेकर अशा सेलिब्रेटींनी तिला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.