'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' च्या भूमिकेत निखिल राऊतला मिळतय प्रेक्षकांंचं भरभरून प्रेम

कलाकारांना अवॉर्डपेक्षा प्रेक्षकांकडून मिळणारी दाद अधिक महत्त्वाची असते. कामाचे खरे समाधान प्रेक्षकांकडून मिळणार्‍या दादेतून मिळते. 

Updated: Apr 15, 2018, 03:05 PM IST
'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' च्या भूमिकेत निखिल राऊतला मिळतय प्रेक्षकांंचं भरभरून प्रेम  title=

मुंबई : कलाकारांना अवॉर्डपेक्षा प्रेक्षकांकडून मिळणारी दाद अधिक महत्त्वाची असते. कामाचे खरे समाधान प्रेक्षकांकडून मिळणार्‍या दादेतून मिळते. 

निखिल राऊतला खास दाद 

प्रेक्षकांकडून दाद मिळणे,  कौतुकाची पाठीवर थाप मिळणे, ही कलाकारांसाठी खूप महत्वाची बाब असते. जेव्हा रसिक प्रेक्षक एखादी कलाकृती पाहून भारावून जातात आणि त्या कलाकाराला त्याच्या कामाची खरी पावती देतात, त्याच्या कामाचं भरभरून कौतुक करतात,  तेव्हा रसिकांना 'माय बाप मानणार्‍या कलाकाराला सुध्दा  त्याच्या कामाचं, कष्टाचं, चिज झाल्यासारखं वाटतं. अशीच एक घटना निखिल राऊत या अभिनेत्यासोबत घडली आहे.

 "चॅलेंज" या नाटकामध्ये तो ' स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ' यांची भूमिका साकारत आहे. या नाटकाच्या एका प्रयोगाच्या वेळी त्याचा अभिनय पाहून प्रेक्षक इतके भारावले की, प्रयोगानंतर प्रेक्षकांनी निखिलला भेटून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.  नाटक पाहून भारावलेल्या एका प्रेक्षकाने या नाटकाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि निखिलला आशिर्वाद म्हणून पैशांचे पाकीट दिले.  

 निखिलला प्रेक्षकांकडून पोचपावती 

 निखिलला तर अनुभव दोनदा आला. एका महिला प्रेक्षकांनी त्याला भेट वस्तू दिली आणि पाकिटात पैसेदेखील दिले, निखिलने ते आशिर्वाद आणि प्रेक्षकांचं प्रेम व त्याच्या कामाची पावती समजून स्विकारले .काही सावरकर प्रेमी तर प्रयोगानंतर अक्षरश: निखिलच्या पाया पडतात. प्रेक्षकांच्या या प्रेमाविषयी निखिल सांगतो की, "कोणताही कलाकार हा आपली कलाकृती हि श्रद्धेने, मेहनतीने सादर करीत असतो. रंगभूमीची अगदी मनापासून आणि निष्ठेने सेवा करीत असतो, त्यावेळी रंगभूमीसुद्धा त्याला भरभरून देत असते. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलोय,  परंतु प्रयोगागणिक मिळणाऱ्या ह्या प्रेमामुळे खूप छान वाटतय.जबाबदारी वाढल्याची जाणीव देखिल होतीये."