आधी कसा होता आणि आता... कॉमेडियन मनीष पॉलचं थक्क करणारं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन

Manish Paul Physical Transformation: अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनसाठी कायमच ओळखले जातात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. परंतु चित्रपटातील भुमिकेसाठी त्यांची विशेष तयारी घेतली जाते तेव्हा प्रॉस्थेटिक मेकअपनं ते आपली पात्रं रंगवतात. चला तर मग जाणून घेऊया आपल्या आगामी सिरिजसाठी मनीष पॉलनं कशी मेहनत घेतली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 15, 2023, 06:13 PM IST
आधी कसा होता आणि आता... कॉमेडियन मनीष पॉलचं थक्क करणारं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन  title=
June 15, 2023 | Manish Paul physical transformation see photos goes viral (Photo: Manish Paul Instagram)

Manish Paul Physical Transformation: सध्या सिनेजगतात चर्चा असते ती म्हणजे कलाकारांच्या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनची. जीम करणं, फिजिकली फीट राहणं हे अत्यंत आवश्यक असतेच. आजकाल सेलिब्रेटी हे आपल्या फिटनेसवर चांगलेच लक्ष केंद्रित करताना दिसतात. तुम्ही त्यांचे इन्टाग्राम पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईलच की सेलिब्रेटी हे त्यांच्या फीटनेसवर चांगलाच भर देताना दिसतात. परंतु भुमिकेसाठीही अनेक कलाकार हे चांगलीच मेहनत घेताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या अभिनेता मनीष पॉल चांगलाच चर्चेत आला आहे. त्याची जिओ सिनेमावरील रफूचक्कर ही वेबसिरिज सध्या चांगलीच गाजते आहे. त्यामुळे या वेबसिरिजची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. परंतु त्यातूनही या सिरिजमधल्या मनीष पॉलची भुमिका सध्या विशेष चर्चेत आली आहे. 

यावेळी त्याचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून त्याचे प्रचंड कौतुक करण्यात आले आहे. त्यानं या वेबसिरिजमधून चार वेगवेगळ्या रूपातल्या भुमिका निभावल्या आहेत. ज्यावर त्यानं प्रॉस्थेटिक मेकअपचा प्रयोग केला आहे. या चारही लुकमध्ये तो अत्यंत वेगळा आणि ओळखूच न येणारा असा अभिनेता दिसतो आहे. त्यामुळे त्याचा हा लुक पाहून सगळेच भारावून गेले आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे. सोबतच त्याला त्याच्या या नव्या भुमिकेसाठी भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं इन्टाग्रामवरून सध्या हे फोटोज शेअर केले आहेत. 

हेही वाचा - भावाच्या निधनानंतर अजूनही सावरली नाहीये अपूर्वा नेमळेकर; पाहा डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

मनीष पॉलनं आपल्या या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्यानं आधी 10 किलोचे वजन वाढवले होते आणि मग चार महिने जिम केल्यानंतर त्यानं अजून 15 किलो वजन वाढवलं व नंतर बॉडी बिल्डिंगसाठी त्यानं अडीच महिने जीममध्ये वर्केआऊट केल्याचे मीडिया रिपोर्ट्सनुसार कळते आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार हे आपल्या भुमिकेसाठी मेहनत घेताना दिसतात. त्यामुळे त्यांची फारच चर्चा रंगताना दिसते. सध्या काही दिवसांपुर्वी फरान अख्तरच्या 'तूफान' या चित्रपटासाठी केलेले फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. ज्याचेही प्रचंड कौतुक झाले होते. हृतिक रोशन, आमिर खान हे आपल्या हटके फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनसाठी ओळखले जातात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या 'पा' या चित्रपटातील भुमिकेसाठी फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनल केले होते. ज्याचेही प्रचंड कौतुक झाले होते. काहीवेळेला कलाकार हे आपल्या या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनवरून ट्रोलही झाले आहेत. परंतु त्यांच्या या मेहनतची सगळीकडून प्रशंसा होताना दिसते. मनीष पॉलनं ओटीटीवर पदार्पण केले होते. 15 जूनला त्याची ही सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.