मलायकाला तिचा मुलगा कधीही आई म्हणून हाक मारत नाही...

असं सगळं होऊन देखील मलाइकाचं तिच्या मुलासोबत एक खास नातं आहे. ज्याबद्दल ती अनेकदा बोलत असते.

Updated: Feb 11, 2022, 03:31 PM IST
मलायकाला तिचा मुलगा कधीही आई म्हणून हाक मारत नाही...  title=

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. ती सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती कधी अर्जुन कपूरमुळे, तर कधी आपला एक्स नवरा अरबाजमुळे चर्चेत असते. मलायकाचं लग्न बॉलिवू़ड अभिनेता आणि प्रोड्यूसर आरबाज खान सोबत झालं. मलायका आणि अरबाजला एक मुलगा आहे. या दोघांनी काही वयक्तीक कारणामुळे घटस्फोट घेतला, ज्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूरच्या अफेअर्सच्या बातम्या येऊ लागल्या.

असं सगळं होऊन देखील मलाइकाचं तिच्या मुलासोबत एक खास नातं आहे. ज्याबद्दल ती अनेकदा बोलत असते. मलायका आणि तिच्या मुलाचं नातं हे खूपच वेगळं आहे, ती त्यांच्या नात्याबद्दल अनेक मनोरंजक गोष्टी सांगत असते.

मलायकाने अनेक डान्स रिअॅलिटी शोज जज केले आहेत. ज्यापैकी एका शोमध्ये तिने सांगितले होते की, तिला तिचा मुलगा अरहान आई म्हणत नाही. मलायकाचं हे वक्तव्य ऐकून सगळ्यांना धक्का बसला, परंतु पुढे जे काही मलायका बोलली हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

मलायका अरोरा काही काळापूर्वी इंडियाज बेस्ट डान्सर 2 ची जज होती. या शोमध्ये ती गीता कपूर आणि टेरेन्स लुईससोबत दिसली होती. शोमध्ये मलायकाने सांगितले होते की, तिचा मुलगा तिला आई नाही तर एका फनी नावाने हाक मारतो.

मलायकाने सांगितले की, मी माझ्या मुलाला माझ्या आईप्रमाणेच बेटा म्हणून हाक मारते पण अरहान मला ब्रो म्हणतो. ब्रो हा शब्द ब्रदरच्या शॉर्ट फॉर्ममध्ये उच्चारला जातो.

मलायकाची आई बेटा म्हणते

शोमध्ये मलायकाने सांगितले होते की, तिची आई तिला नेहमी बेटा म्हणून हाक मारते. जेव्हा मलाइकाने तिच्या आईला विचारले की, तु मला बेटा का म्हणतेस? मी काही मुलगा नाही. तेव्हा तिच्या आईने सांगितले की, ती त्यांची पहिलं मुलं असल्या कारणाने ती मलायकाला बेटा म्हणते.