Hardik Pandyaची पत्नी Natasa Stankovicचा धमाकेदार डान्स; व्हिडिओ व्हायरल

नताशाचा हा धमाकेदार डान्स चाहत्यांच्या भलताचं पसंतीस पडताना दिसत आहे. 

Updated: Apr 25, 2021, 10:41 AM IST
Hardik Pandyaची पत्नी Natasa Stankovicचा धमाकेदार डान्स; व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई :  भारतीय संघाचा ऑलराउंडर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya)पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. कधी फोटो तर काधी व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकताचं नताशाने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती अमेरिकन रॅपर Cardi B च्या रॅपवर डान्स करताना दिसत आहे. नताशा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

नताशाचा हा धमाकेदार डान्स चाहत्यांच्या भलताचं पसंतीस पडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिचे डान्स मूव्ह आणि अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत. नताशाच्या डान्स व्हिडिओवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी नताशाचा हा व्हिडिओ पाहिला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nataša Stankovic (@natasastankovic__)

सांगायचं झालं तर, सध्या अमेरिकन रॅपर Cardi B हे रॅप सॉन्ग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. निया शर्मा (Nia Sharma) पासून ते देवोलीना भट्टाचार्या (Devoleena Bhattacharjee) अनेक कलाकारांनी यावर व्हिडिओ तयार केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा मोह नताशाला देखील आवरला नाही. 

नताशा आणि हार्दिक सध्या चर्चेत असलेल्या  कपल्सपैकी एक आहे. नताशा आणि हार्दिक गेल्या वर्षी त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव अगस्त्य असं ठेवलं आहे.