'ही' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Depression ची शिकार, बॉयफ्रेंड आणि रिलेशनशिपबद्दल मोठे खुलासे

बॉयफ्रेंड आणि Relationship मुळे 'ही' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Depression मध्ये, काय झालं असावं तिच्यासोबत  

Updated: Dec 17, 2022, 02:21 PM IST
'ही' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री Depression ची शिकार, बॉयफ्रेंड आणि रिलेशनशिपबद्दल मोठे खुलासे title=
famous TV actress Anjali Kapoor deals with depression big revelations about boyfriends and relationships nz

Anjali Kapoor: टीव्ही सीरियल 'बेंथा' फेम अभिनेत्री अंजली कपूर (Anjali Kapoor) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने तिच्या बॉयफ्रेंड आणि रिलेशनशिपबद्दल (Relationship) अनेक मोठे खुलासे केले आहेत. मुंबईसारख्या शहरात राहणं किती कठीण झाले होते हे तिनं सांगितले. ती आणि तिचा जोडीदार एकत्र मुंबईला आले. तिनं येताना सुटकेससोबत अभिनेत्री बनायचे स्वप्न घेऊन आली होती. पण यशाच्या मार्गावर जाताच तिच्या साथादाराने तिची साथ सोडली. पण तिने हार न घेता पुन्हा स्वत:च्या पायावर उभी राहिली. अंजलीने पुढे सांगितले की, ती 3 वर्षे डिप्रेशनमध्ये (Depression) होती. अंजलीचा आयुष्यावरील विश्वास उडाला होता. पण घरी गेल्यावर अभिनेत्रीने तिचा आत्मविश्वास आणि भावनांवर काम केले. अंजलीने सांगितले की, तिला या खडतर प्रवासाने कोणावरही आंधळा विश्वास ठेवायचा नाही हे शिकवलं. 

तो मला सोडून पुढे गेला

मीडियासमोर आपली कहाणी सांगताना अंजली म्हणाली- 'मी आणि माझा जोडीदार मुंबईत एकत्र आलो होतो. मला अभिनय करायचा होता आणि त्यालाही गायक व्हायचे होतं. आम्ही एकमेकांचे सपोर्ट सिस्टीम होतो. पण धडपडत असताना त्याला यश मिळाले आणि तो मला सोडून पुढे गेला. अज्ञात शहरात एकटे राहणे खूप कठीण आहे. ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला त्याने माझा विश्वासघात करुन मला सोडून गेला. त्यामुळे विश्वास ठेवण्यासाठी मला 3 वर्षे लागली.

माझे करिअर पण पणाला 

अभिनेत्री म्हणाली, 'त्याच्या विश्वासघातामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये होते. माझा ढासळलेला आत्मविश्वास आणि आशा घेऊन मी घरी परतले. मला पुन्हा कनेक्ट व्हायला वेळ लागला. गेल्या 3 वर्षात मी माझे करिअर पण पणाला लावले होते. माझे वजन वाढले आणि डिप्रेशनची शिकार झाली. पण आता वर्षांनंतर हिम्मत आली आहे. मी पुन्हा एकदा माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. माझा विश्वास आहे की तुम्ही कोणावरही अवलंबून राहू शकत नाही. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, पण स्वत:वर विश्वास असणे गरजेचे आहे.

आपल्या सुखाची काळजी आपणच...

अंजली पुढे म्हणाली की, ती शिकली आहे की एखाद्याने नेहमी स्वतःला प्रथम स्थान दिले पाहिजे. आपल्या सुखाची काळजी आपणच घेतली पाहिजे. तिनं कुटुंबासोबत वेळ घालवला. कठीण प्रसंगी अंजलीचे कुटुंबीय तिच्या पाठीशी उभे राहिले. अंजलीने सांगितले की, ती रोज काहीतरी नवीन आणि चांगले करण्याचा प्रयत्न करते. कामाबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच ही अभिनेत्री 'फार्म हाऊस' वेब सीरिजमध्ये दिसली आहे.