'बाबा प्रेम कायम आहे' अभिनेत्री धनश्री काडगावकरने शेअर केला लेकासोबत व्हिडिओ

सध्या सोशल मीडियावर धनश्रीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मराठी मालिका सृष्टीतल्या वहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री धनश्री काडगावकर आई झाल्यानंतर काही महिन्यानंतरच पुन्हा सेटवर आली. 

Updated: Aug 6, 2023, 09:07 PM IST
'बाबा प्रेम कायम आहे' अभिनेत्री धनश्री काडगावकरने शेअर केला लेकासोबत व्हिडिओ  title=

मुंबई : धनश्री काडगावकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर कायम तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतंच धनश्रीने तिच्या सोशल मीडियावर तिच्या मुलासोबतचा गोड व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिचा मुलगा कबीर आई तु छान दिसते म्हणाताना दिसतोय यावंर तिला धनश्री विचारते कबीर कसा दिसतो त्यावर ती म्हणते कबीर कसा दिसतो. छान दिसतो? यावर कबीर म्हणतो, बाबा छान दिसतो, यावंर भावुक होत धनश्री म्हणते आई गं... हो ग बाबा तुझा खूप छान दिसतो. आणि ती त्याच्या डोक्यावर किस करते. सध्या धनश्रीचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या दोघांचा क्यूटनेस पाहून चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतायेत. 

एका युजरने कमेंट करत लिहीलंय की, खूप गोड आहे पिल्लू. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय, खूप क्यूट. तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय, कबीर आणि कबीरची आई खूपच गोड आहेत. तर अजून एकाने म्हटलंय खूपच गोड गॉड ब्लेस यू. अशा अनेक प्रकारच्या कमेंट चाहते त्यांच्या या व्हिडिओवर करत आहेत. तर धनश्रीने हा व्हिडिओ शेअर करत, बाबा प्रेम कायम आहे ..
Love u baba असं या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे.

सध्या सोशल मीडियावर धनश्रीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मराठी मालिका सृष्टीतल्या वहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री धनश्री काडगावकर आई झाल्यानंतर काही महिन्यानंतरच पुन्हा सेटवर आली. आई झाल्यानंतर फार वर्षे ब्रेक न घेता, कामला सुरुवात केली. धनश्री आता तू चाल पुढं मालिकेत शिल्पी या खलनायिकेच्या भूमिकेत दिसतेय. या मालिकेसाठी तिला पुण्यातून मुंबईत शिफ्ट व्हावं लागलं. खरं तर लगेच पुण्यातून मुंबईत शिफ्ट होणं सोपं काम नव्हतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री धनश्री काडगावकर ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने तिला नवी ओळख दिली. तर सध्या ती ‘तू चाल पुढं’ मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. धनश्रीच्या कामाचं नेहमी कौतुक होत असतंच पण याचबरोबर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.