EVM मशीन बंद असल्यानं आदेश बांदेकर संतप्त

Aadesh Bandekar Loksabha Election 2024 : आदेश बांदेकर यांनी व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप...

दिक्षा पाटील | Updated: May 20, 2024, 02:53 PM IST
EVM मशीन बंद असल्यानं आदेश बांदेकर संतप्त title=
(Photo Credit : Social Media)

Aadesh Bandekar Loksabha Election 2024 : आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचं मतदान सुरु आहे. तर नेहमी प्रमाणेच यावेळी देखील मतदान करण्यासाठी सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी हजेरी लावली आहे. मात्र, मतदान करताना काही लोकांना त्रास सहन करावा लागतोय. त्याविषयी सांगत मराठमोळे अभिनेते आदेश बांदेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. 

आदेश बांदेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी सांगितलं की पवईतील 57 आणि 58 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन या बंद पडल्यानं मतदारांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. याविषयी बोलताना आदेश बांदेकर चांगलेच संतापल्याचे दिसत आहे. इतकंच नाही तर त्यांच्यासोबत तिथे उपस्थित असलेले सगळेच मतदार संतापल्याचे पाहायला मिळाले. आदेश बांदेकर म्हणाले, "मी आता पवईतील एका मतदान केंद्रावर आहे. हिरानंदानीसारखा सुशिक्षित परिसर आहे. इकडच्या 57 आणि 58 या दोन्ही पोलिंग बूथवरील याद्या बंद झाल्या आहेत. सगळ्या मशिनरी बंद आहेत. तीन-तीन तास प्रतीक्षा केल्यानंतर काहीजण घरी जात आहेत. दोन तासांपासून आम्ही उन्हात प्रतीक्षा करतोय. कोणी उत्तरच देत नाहीयेत. हिरानंदानी फाऊंडेशन स्कूलमधील मतदान केंद्रावर ही परिस्थिती आहे. वयस्कर मतदार प्रतीक्षा करून घरी परतत आहेत. लोकशाहीचा हा उत्सव आहे. पाच वर्षांपासून यासाठी तयारी केली जाते. पण इथे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. इथले लोक खूप चिडले आहेत. मी स्वत: दोन-तीन तासांपासून थांबलोय. मला माझ्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. मशीन बंद पडतात आणि दोन-दोन तास त्यावर काही उपाय होत नाही, हे अत्यंत वाईट आहे." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'तरुणपणी असे नखरे दाखवायचे'; ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकर यांनी दिलं सडेतोड उत्तर

दरम्यान, आदेश बांदेकर यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'सगळीकडे एकसारखीच समस्या आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'इलेक्शन कमीशनकडे तक्रार करा सर.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'सगळा अंधाधुंदी कारभार आहे हा तर.' आणखी एक नेटकरी म्हणाला की 'लोकशाही व संविधानाची विटंबना चालू आहे याला लगाम घातलाच पाहिजे'. दुसरा नेटकरी म्हणाला, 'लोकशाहीची हत्या चालली आहे इलेक्शन कमिशन कडून…. मतदान करा म्हणतात आणि वोटिंग मशीन बंद करतात…'