'अश्विनला बाहेर का काढलं, त्याने काय चुकीचं केलं', सुनील गावसकर रोहित शर्मावर संतापले

अश्विनला का बाहेर काढलं?

आयसीसी वर्ल्डकपमधील 9 व्या सामन्यात आज भारत आणि अफगाणिस्तान भिडत आहेत.

अफगाणिस्तानची फलंदाजी

दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडिअममधील सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आर अश्विनला विश्रांती

या सामन्यात भारतीय संघाने बदल केले आहेत. या सामन्यात आर अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे.

शार्दूल ठाकूरला संधी

मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या आर अश्विनच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.

34 धावा देत एक विकेट

अश्विनने मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात 10 ओव्हर्समध्ये 34 धावा देत एक विकेट घेतली होती.

सुनील गावसकर संतापले

टॉसनंतर आर अश्विनला संघात जागा दिली नसल्याचं समजताच सुनील गावसकर संतापले. 'मागील सामन्यात त्याने अशी काय चूक केली होती, ज्यामुळे त्याला जागा दिली नाही,' अशी विचारणा त्यांनी केली.

जाहीर केली नाराजी

आर अश्विनला संघात जागा न दिल्याने सुनील गावसकर फार नाराज दिसत होते. आर अश्विनला अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात संधी द्यायला हवी होती असं ते म्हणाले आहेत.

इरफान पठाणलाही आश्चर्य

कॉमेंट्री बॉक्समध्ये असणाऱ्या इरफान पठाणनेही मधल्या ओव्हर्ससाठी आर अश्विन संघात हवा होता, हे मान्य केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story