फ्रीजमध्ये ठेवलेलं पीठ काळं व कडक होतं? ही पद्धत वापरल्यास पोळ्या होतील मऊ

अनेक गृहिणी रात्री फ्रीजमध्ये कणिक मळून ठेवतात आणि सकाळी पोळ्या लाटतात

मात्र, सकाळी फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक काळी पडते किंवा कडक होते. अशावेळी चपात्याही बिघडतात.

पण या पद्धतीचा वापर करुन फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या चपात्या लाटल्यास त्या छान होतात.

फ्रीजमधून बाहेर काढलेले कणिक सर्वात आधी कोमट पाण्यात टाका. नंतर अर्ध्या तासानंतर पीठ चांगले मळून घ्या. यामुळं पीठातील कडकपणा निघून जाईल.

कणिक फ्रीजमध्ये ठेवायची असल्यास एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. त्यामुळं पीठ मउ राहते आणि पोळ्याही मऊ होतात.

फ्रीजमधून पीठ काढून लगेचच पोळ्या लाटायला घेऊ नका.

पीठ बाहेर काढल्यानंतर ते रुम टेम्प्रेचरला आल्यानंतरच पोळ्या लाटायला घ्या त्यामुळं पोळी मऊ होईल.

VIEW ALL

Read Next Story