रेल्वेचे तिकिट कॅन्सल केल्यास प्रवाशांना किती रिफंड मिळतो?

रेल्वेने प्रवास करत असताना आधीपासूनच तिकिट बुकिंग करणे गरजेचे आहे.

मात्र, कधी अचानक तिकिट रद्द करण्याची वेळ येते तेव्हा कन्फर्म तिकिटांवर कॅन्सलेशन चार्जदेखील लागतो

कोणत्या श्रेणीत किती कॅन्सलेशन चार्ज लागतो व प्रवाशांचे किती पैसे कट होतात, जाणून घेऊया.

तुमच्याकडे कन्फर्म तिकिट असेल आणि प्रवासाच्या 48 तासाआधी तुम्ही तिकिट रद्द करत असाल तर फर्स्ट क्लास आणि एग्झीक्युटिव्ह क्लासवर तिकिटावर 240 रुपये कॅन्सलेशन चार्ज लागतात.

जर तुम्ही सेकंड एसीने प्रवास करत असाल तर रेल्वे तुमच्याकडून 200 रुपये कॅन्सलेशन चार्ज घेते

जर तुम्ही थर्ड एसी चेअर किंवा थर्ड एसी इकॉनॉमी क्सालमधून प्रवास करत असताना 48 तासांआधी तिकिट रद्द केल्यास 180 रुपये रेल्वेकडे भरावे लागतात.

स्लीपर क्लाससाठी 120 रुपये आणि सेकंड क्लाससाठी 60 रुपये कॅन्सलेशन चार्ज द्यावे लागतात.

जर तुम्ही ट्रेनच्या डिपार्चर वेळेच्या 12 तास आधी किंवा 2 तासांच्या आधी तिकिट रद्द केले तर तुमच्या तिकिटांच्या 25 टक्के रक्कम कापली जाते.

VIEW ALL

Read Next Story