बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी20 वर्ल्ड कपबाबात मोठी भविष्यवाणी केली आहे. कोणते चार संघ सेमीफायनल जातील त्या संघांची नावंही सांगितली आहेत.

टी20 वर्ल्ड कपची सेमीफायनल गाठणाऱ्या चार संघात इंग्लंड आणि पाकिस्तान संघांना स्थान देण्यात आलेलं नाही.

जय शाह यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे चार संघ टी20 वर्ल्ड कपची सेमीफायनल गाठू शकतात.

यंदाच्या टी20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी अनेक संघ दावेदार आहेत. पण टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाला टी20 नाव कोरु शकतात असं त्यांनी म्हटलं आहे.

जय शाह यांच्या मते टी20 वर्ल्ड कपमध्ये अनुभव खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांच्या मते टीम इंडियात अनुभवी आणि युवा खेळाडूंचं योग्य संतुलन आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडिया आयर्लंडशी दोन हात करेल.

9 जुनला टीम इंडिया पाकिस्तानशी भिडेल. त्यानंतर अमेरिका आणि कॅनडाशी सामने होतील. टीम इंडियाचे सर्व सामने अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये खेळवले जाणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story