RCB vs CSK : आरसीबीच्या प्लेऑफचं टार्गेट ठरलं; चेन्नईला 'इतक्या' धावांवर रोखावं लागणार

RCB target for playoffs : आरसीबीला आता प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर चेन्नईला 200 च्या आत पराभूत करावं लागणार आहे. 

सौरभ तळेकर | Updated: May 18, 2024, 10:15 PM IST
RCB vs CSK : आरसीबीच्या प्लेऑफचं टार्गेट ठरलं; चेन्नईला 'इतक्या' धावांवर रोखावं लागणार title=
RCB target for playoffs

Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings : दोन्ही संघांसाठी करो या मरो सामन्यात आरसीबीने चेन्नईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला अन् 218 धावा उभ्या केल्या. आता आरसीबीला आता प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर चेन्नईला 200 च्या आत पराभूत करावं लागणार आहे.

आरसीबीने चेन्नईविरुद्ध 20 षटकांत पाच गडी गमावून 218 धावा केल्या. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर आरसीबीने चांगली सुरुवात केली. पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात पॉवर प्लेच्या पहिल्या तीन षटकांमध्ये विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांच्यात 31 धावांची भागीदारी झाली. यानंतर शेवटच्या तीन षटकात केवळ 11 धावा झाल्या. पॉवरप्लेनंतर कोहली आणि डुप्लेसिसकडून तुफान खेळी झाली आणि दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. 

दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर पाटीदारने या सामन्यात 23 चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. दिनेश कार्तिक 14 धावा करून बाद झाला. यानंतर ग्लेन मॅक्सवेलने केवळ पाच चेंडूंचा सामना करत 16 धावा केल्या. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने दोन तर तुषार आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी एक विकेट घेतली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महेश थीक्षाना.