World Family Day : 'ही' 10 कुटुंब इतकी गडगंज श्रीमंत की ठरवलं तर चालवू शकतात 21 देश!

World Family Day : विभक्त कुटुंबांना एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व समजून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन दरवर्षी 15 मे रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जगात अशी 10 कुटुंब इतकी गडगंज श्रीमंत आहेत की ती 21 देश चालवू शकतात. 

May 14, 2024, 16:06 PM IST
1/11

 केंद्रीय गुप्तचर संस्थेने 2017 मध्ये प्रकाशित केलेल्या डेटानुसार सरकारी बजेट असलेल्या देशांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार 21 देशांचं सरकारी बजेट हे 152.1 मिलियन एवढं आहे. आता आपण या अफाट संपत्ती असलेल्या श्रीमंत कुटुंबाची संपत्तीचा आकडा पाहिला तर तो साधारण 156.5 मिलियनपेक्षा जास्त आहे. यावरुन तुमच्या लक्षात आलं असेल या 10 कुटुंबाकडे इतकी अमाप संपत्ती आहे की, ते 21 देशांचा कारभार सांभाळू शकतात. विशेष म्हणजे या कुटुंबामध्ये भारतीय कुटुंबाचाही समावेश आहे. चला मग एक नजर टाकूयात या श्रीमंत लोकांच्या यादीवर. 

2/11

संयुक्त राष्ट्रमधील वॉल्टन हे कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. वॉलमार्ट ही रिटेल चेन जगात त्यांचं जाळं पसरलंय. त्यांची संपत्ती तब्बल 289.8 अब्ज डॉलर्स इतकी आहे. 

3/11

दुसऱ्या क्रमांकावर आहेत स्वीडनमधील वॉलेनबर्ग कुटुंब असून त्यांची एकूण संपत्ती ही 278 अब्ज डॉलर्स एवढी आहे.

4/11

बर्नार्ड अर्नॉल्ट हे कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत यादी तिसऱ्या क्रमांकावर आहे. अर्नॉल्ट हे LVMH (Moet Hennessy Louis Vuitton) चे CEO असून हा एक लक्झरी ब्रँड आहे. यांची संपत्तीचा आकडा हा 233 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. 

5/11

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर अमेरिकेचे कोच कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबाचे एकूण संपत्ती 124.5 अब्ज डॉलर आहे. 1940 मध्ये फ्रेड कोच यांनी द वूड रिव्हर ऑईल अँड रिफायनिंग कंपनीची स्थापना केली होती.

6/11

पाच क्रमांकावर भारतातील अंबानी कुटुंब आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज , रिलायन्स जिओ इन्फोकॉम , रिलायन्स रिटेल , रिलायन्स पॉवर , रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर , रिलायन्स कॅपिटल , रिलायन्स एंटरटेनमेंट हे संपत्तीचे स्त्रोत आहेत. त्यांच्याकडे 116 अब्ज डॉलरपेक्षा जास्त पैसा आहे. 

7/11

श्रीमंत कुटुंबाच्या यादी सहाव्या क्रमांकावर जॅकलिन मार्स यांचं कुटुंब आहे. व्हर्जिनियातील सर्वात श्रीमंत कुटुंब असून 115.4 अब्ज डॉलरपेक्षा जास्त पैसा संपत्ती त्यांच्या नावावर आहे. 

8/11

कधीकाळी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे अमानसिओ अॅर्टिगा हे आज 21 देशांचा आर्थिकदृष्ट्या चालवू शकतात. त्यांची नेटवर्थ हे 112.3 अब्ज डॉलर एवढी आहे. 

9/11

दूरसंचार, शिक्षा, स्वास्थ्य सेवा, औद्योगिक विनिर्माण, खाद्य और पेय पदार्थ, रियल एस्टेट, एयरलाइंस, मीडिया, खनन, तेल, आतिथ्य, मनोरंजन क्षेत्रातून संपत्ती जमा करणारे कार्लोस स्लिम आठव्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती ही 102 इतकी आहे. 

10/11

पुढं नाव आहे, फ्रान्सचे बेटेनकोर्ट हे कुंटुंब. फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. मेयर्स यांच्याकडं 99.5 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. 

11/11

फ्रान्सचे दुसरं श्रीमंत कुटुंब हर्मीस याचादेखील समावेश आहे. या कुटुंबाती मालमत्ता ही 94.6 एवढी आहे.