यंदा प्रमोशन, पगारवाढीचे योग आहेत का? अंकशास्त्रातून जाणून घ्या कसे राहील तुमचे वर्ष

Numerology For Appraisal : आजच्या जगात चांगली आणि सुरक्षित नोकरी मिळणं कठीण झालं आहे. त्यात आता प्रमोशन आणि इंक्रीमेंटचे दिवस असल्याने यावर्षी आपलं बँक बॅलेन्स वाढणार का? अशी चिंता प्रत्येक नोकरदाराला पडलीय. अंकशास्त्रात तुमच्या मूलांकानुसार कोणाला प्रमोशन तर कोणाला पगारवाढ होणार याची भविष्यवाणी केलंय. अंकशास्त्रानुसार नोकरीतील यश आणि पदोन्नतीबद्दल तुमच्या कुंडलीतील मंगळ, बुध आणि शनि यांची स्थिती महत्त्वाची असते. 

May 18, 2024, 14:31 PM IST
1/9

अंकशास्त्रानुसार 1 मूलांक असलेल्या लोकांना तुम्ही जेवढा विचार करत आहात तेवढीच इंक्रीमेंट मिळणार आहे. अंकशास्त्रानुसार तुम्हाला 10 ते 14% पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.   

2/9

मूलांक 2

मूलांक 2 असलेल्या व्यक्तींसाठी हे वर्ष आर्थिकदृष्ट्या निराशा करणार आहे. तुमच्या उत्पन्नात घट होणार आहे. तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन कराव लागू शकतं. अंकशाास्त्रानुसार तुम्हाला 6 ते 9% पगारवाढ होऊ शकते.   

3/9

मूलांक 3

अंकशास्त्रानुसार मूलांक 3 साठी हे वर्ष आनंदाच असेल. चांगली बढती किंवा पगारवाढ मिळणार आहे. वरिष्ठ आणि सहकारी तुमच्या कामावर खूष असणार आहे आणि तुम्हाला 11 ते 14%  पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.   

4/9

मूलांक 4

मूलांक क्रमांक 4 असलेले लोक हवं तसं काम अजून करताना दिसत नाही आहे. त्यामुळे वरिष्ठ या लोकांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. या लोकांना या वर्षी 7 ते 9% पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे.   

5/9

मूलांक 5

मूलांक 5 च्या लोकांना त्यांच्या मेहनतीच फळ मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत होणार आहात. तुम्हाला साधारण  9 ते 14%  पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे.  

6/9

मूलांक 6

अंकशास्त्राननुसार 6 मूलांक हा आर्थिक बाबीसाठी अनुकूल मानला जातो. या लोकांना या वर्षी चांगल प्रमोशन होणार आहे. तुम्हाला 12 ते 15% पगारवाढ मिळणार आहे.   

7/9

मूलांक 7

या मूलांकच अपेक्षेपेक्षा जास्त चांगल होणार आहे. तुम्ही जी पगारवाढ विचार करत आहात, तेवढीच तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला 12 ते 15% पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.   

8/9

मूलांक 8

तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळणार आहे. एकंदरीत तुमचे चांगले दिवस सुरू होणार असून तुम्हाला 11 ते 15% पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. 

9/9

मूलांक 9

या लोकांचे वरिष्ठांशी संबंध अनुकूल नसल्याने त्याचे परिणामी त्यांना त्रासदायक ठरणार आहे. या वर्षी तुम्हाला फक्त 9 ते 11% च्या दरम्यान मूल्यांकन मिळण्याची शक्यता आहे. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)