मोठी अपडेट! गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून निघाला धूर, घाबरलेल्या प्रवाशांनी मारल्या उड्या

Godan Express:  घाबरलेल्या अवस्थेत काही प्रवाशांनी उड्या मारल्या. यानंतर नेमका काय प्रकार घडतोय? हे पाहण्यासाठी गार्ड आणि ड्रायव्हर दोघे खाली उतरले

Updated: May 18, 2024, 02:52 PM IST
मोठी अपडेट! गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून निघाला धूर, घाबरलेल्या प्रवाशांनी मारल्या उड्या title=

Godan Express: इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर निघत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गार्ड आणि चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. धूर बघून प्रवाशांची तारांबळ उडाली. तसेच घाबरलेल्या अवस्थेत काही प्रवाशांनी उड्या मारल्या. यानंतर नेमका काय प्रकार घडतोय? हे पाहण्यासाठी गार्ड आणि ड्रायव्हर दोघे खाली उतरले आणि त्यांनी एक्स्प्रेस तपासली. 

अप मार्गाच्या गोदान एक्स्प्रेसच्या बोगीच्या खाली असलेले लायनर ओव्हर हीट होऊन घासल्याने धूर निघाल्याचे सांगण्यात येत आहे. 
यानंतर गाडी इगतपुरी स्थानकात आली. गाडीची बोगी लायनर दुरुस्त करून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. 

ट्रेन चे रिझर्व्हेशन कोच नंबर एस् 07 चे ब्रेक लॉकर - कॅलीपर धावत्या स्थितीत चाकांना लॉक झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. यामुळे घर्षण झाले आणि चाकांना आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. 

एक्सप्रेस थांबवून फायर एक्सटुबीशनच्या मदतीने ट्रेनचे ॲसिस्टंट लोको पायलट आणि एसी ॲटेंडट यांच्या मदतीने आग विझवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.