22 कोटी KM अंतरावरून पृथ्वीवर कुणी पाठवला लेझर सिग्नल? NASA च्या संशोधकांनी केला मोठा खुलासा

अंतराळात एक चमत्कारिक घटना घडली आहे. अंतराळातून 22 कोटी KM अंतरावरून  NASA ला लेझर सिग्नल मिळाला आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 3, 2024, 07:02 PM IST
 22 कोटी KM अंतरावरून पृथ्वीवर कुणी पाठवला लेझर सिग्नल? NASA च्या संशोधकांनी केला मोठा खुलासा title=

NASA Psyche Mission : अतराळातून 22 कोटी KM अंतरावरून पृथ्वीवर लेझर सिग्नल आला. पृथ्वीवर आलेला हा लेझर सिग्नल म्हणजे संशोधकांच्या प्रयोगातील मोठे यश आहे. या  लेझर सिग्नलमुळे अंतराळातील अनेक रहस्य उलगडणार आहेत. पृथ्वीवर हा लेझर सिग्नल कुणी पाठवला याबाबत  NASA च्या संशोधकांनी  मोठा खुलासा केला आहे. 

पृथ्वीवर आलेला हा लेझर सिग्नल NASA च्या Psyche spacecraft ने पाठवला आहे.   NASA च्या Psyche Mission मोहिमेतील हे पहिले मोठे यश आहे. नासाच्या सायकी स्पेसक्राफ्टवरील डीप स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन्स (डीएसओसी) या उपकरणाने हा संदेश पाठवला आहे.  नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) येथील प्रकल्पाच्या ऑपरेशन्स प्रमुखाने सिग्नल ट्रान्समिशनच्या प्रक्रियेबबात महि्ती दिली. 8 एप्रिल रोजी सुमारे अंतराळ यानाचा 10 मिनिटांचा डेटा डाउनलिंक केला गेला. हा डुप्लिकेट डेटा नंतर लेझर कम्युनिकेशनद्वारे प्रसारित केला गेला. सायकीचा मूळ डेटा NASA च्या डीप स्पेस नेटवर्क (DSN) वरील  रेडिओ फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन चॅनेलवर प्रसारित केला गेला. 

13 ऑक्टोबर 2023 रोजी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून नासाच्या सायकी स्पेसक्राफ्टने उड्डाण केले. सायकी स्पेसक्राफ्ट हे डीप स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन्स (डीएसओसी) प्रणालीवर कार्यरत आहे.  या तंत्रज्ञाच्या मदतीने खोल अंतराळात अस्तित्वात असलेल्या ऑब्जेक्टशी संपर्क साधण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. खोल अंतराळात अंतराळ यानाशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी पृथ्वीवर मोठे अँटेना बसवण्या आले आहेत. रेडिओ सिग्नलच्या मदतीने या अँटेनामधून संदेश पाठवला आणि प्राप्त केला जातो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने सध्या वापरात असलेल्या अंतराळ संप्रेषण उपकरणांपेक्षा 10 ते 100 पट वेगाने माहिती पाठवू शकतो. सायकी स्पेसक्राफ्टने कॅलिफोर्नियातील पालोमार वेधशाळेत हेल टेलिस्कोपला लेझर संदेश पाठवत संपर्क साधला आहे.

प्रामुख्याने Psyche 16 या लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी Psyche Mission लाँच करण्यात आले आहे.  Psyche spacecraft चे आकारमान 226 किलोमीटर एवढंच आहे.   16Psyche Gold Planet आपल्या सूर्याभोवती  एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागतो. या लघुग्रहावर एक दिवस 4.196 तासांचा असतो. या ग्रहाचे वजन पृथ्वीच्या चंद्राच्या वजनाच्या फक्त 1 टक्के आहे. गुरू आणि मंगळ ग्रहादरम्यान हा लघुग्रह आहे. 12 ऑक्टोबर 2023 रोजी 'स्पेसएक्स'ने नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून NASA Psyche यान अवकाशात झेपावले.   2026 पर्यंत हे यान लघुग्रहावर पोहोचणार आहे. ऑगस्ट 2029 मध्ये Psyche spacecraft  या सोन्याच्या लघुग्रहावर पोहचणार आहे.  नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) मधून या अवकाशयानाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.  नासाचे  Psyche spacecraft मॅग्नेटोमीटर वापरून या ग्रहाच्या चुंबकीय शक्तीचे मोजमाप करत आहे.