डुकराच्या किडनीवर जगणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा कसा झाला मृत्यू? डॉक्टर म्हणतात...

Pig Kidney Transplant : दोन महिन्यांपूर्वी डुकराची किडनी प्रत्योपित केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. प्राण्यांचे अवयव प्रत्यारोपित करणे महागात पडले का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. पण डॉक्टरांनी सांगितलं की...

नेहा चौधरी | Updated: May 13, 2024, 11:25 AM IST
डुकराच्या किडनीवर जगणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा कसा झाला मृत्यू? डॉक्टर म्हणतात... title=
How did pig kidney transplanted person die after 2 months Doctor says

Pig Kidney Transplant : जगात मानवी अवयवांची मोठी कमरता असल्याने हजारो रुग्णांनी जीव गमावलाय. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी मानवी शरीरात पहिल्यांदाच डुकराची किडनी बसवण्यात आली. ही किमया अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केली. पण यासंदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. या पहिल्या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचा दोन महिन्यांनी मृत्यू झाला आहे. 
रिचर्ड रिक स्लेमन त्या व्यक्तीच नाव असून शनिवारी, रुग्णालय आणि कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूची पुष्टी केली. या घटनेनंतर प्राण्यांचे अवयव प्रत्यारोपित करणे महागात पडले का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. यावर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एक निवेदन जाहीर केलंय. (How did pig kidney transplanted person die after 2 months Doctor says)

स्लेमनच्या किडनीचे 2018 मध्ये प्रत्यारोपण झालं होतं. पण गेल्या वर्षी ती निकामी होण्याचे संकेत मिळत असल्याने त्याला वारंवार डायलिसिस करावं लागत होतं. त्यामुळे अनेक गुंतागुंत वाढली होती. त्यानंतर डॉक्टराने त्याला डुकराची किडनी लावण्याचा निर्णय घेतला. सर्व चांगल झालं म्हणून कुटुंबाने डॉक्टरांचे आभार मानले. पण दोननंतर त्याचा मृत्यू झाला. 

डॉक्टरांकडून निवेदन जाहीर...

62 वर्षीय रिचर्डवर प्रत्यारोपित करणांऱ्या पथकाने त्याचा निधनाबद्दल शोक व्यक्त केलंय. ते म्हणाले की, ''रिचर्डच्या मृत्यूमागे डुकराची किडनी लावणे हे कारण नाही. डुकराची किडनी रिचर्डच्या शरीरात किमान 2 वर्षे व्यवस्थित काम करु शकत होती. रिचर्ड हा टाइप 2 मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे त्रस्त होता. रिचर्डवर 16 मार्चला प्रत्यारोपण झाल्यानंतर त्याला डायलिसिसची गरज नव्हती.''