'पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं तर..', पुण्यातून राज ठाकरेंचा इशारा; म्हणाले, 'हा राज ठाकरे..'

महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी पुण्यात घेतलेल्या जाहीर सभेमध्ये हिंदू-मुस्लिम मुद्द्याचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच राज ठाकरेंनी अयोध्येत राम मंदिर उभं राहण्याचं पूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं असल्याचं म्हटलं. राज ठाकरेंनी धर्मावरुन राजकारण करण्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीचा उल्लेख करत टीका केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 11, 2024, 09:21 AM IST
'पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं तर..', पुण्यातून राज ठाकरेंचा इशारा; म्हणाले, 'हा राज ठाकरे..' title=
राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर साधला निशाणा

महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी पुण्यात घेतलेल्या जाहीर सभेमध्ये हिंदू-मुस्लिम मुद्द्याचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच राज ठाकरेंनी अयोध्येत राम मंदिर उभं राहण्याचं पूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं असल्याचं म्हटलं. राज ठाकरेंनी धर्मावरुन राजकारण करण्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीचा उल्लेख करत टीका केली.

मशिदींमधून महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी फतवे

"जे सुज्ञ मुसलमान आहेत ते फतव्यांना जुमानत नाहीत पण काँग्रेसला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा म्हणून मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये फतवे निघत आहेत," असा दावा राज ठाकरेंनी. "मुस्लिम समाजाला तुम्ही काय गुरं-ढोरं समजता का? त्यांना स्वतःचा विवेक नाही का? त्यांनाही समजतंय कोण आपल्याला वापरून घेत आहेत. मशिदींमधून महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी फतवे काढले जात असतील तर आज हा राज ठाकरे फतवा काढतोय, "तमाम हिंदू माता-भगिनी-बांधवांसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा," असं म्हणत राज ठाकरेंनी धार्मिक मुद्द्यालाही हात घातला.

पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं तर 

"आपल्या देशात अनेक चांगले मुसलमान आहेत. ते आपापलं काम व्यवस्थित करत आहेत. प्रामाणिकपणे जगत आहेत. पण ज्यांना धार्मिक धुमाकूळ घालायचा आहे पण गेल्या 10 वर्षात डोकं वर काढता आलं नाहीये. त्यांना काँग्रेसच्या माध्यमातून डोकं वर काढायचं आहे. पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं तर हे धर्मांध रस्त्यावर फिरणं कठीण करून ठेवतील. 80-90 साली जो धार्मिक उन्माद सुरु होता तसाच पुन्हा हे उन्माद घालतील आणि त्या उन्मादाचा शेवट झाला तो बाबरी मस्जिदीचा ढाचा पडणं," असं राज ठाकरे म्हणाले. 

नक्की वाचा >> 'मोदींच्या काळात ‘हिंदू खतरे में’ असेल तर..', ठाकरेंचा टोला! म्हणाले, 'आगलाव्या पक्षांनी..'

राम मंदिराचा उल्लेख

"एक गोष्ट स्पष्ट सांगतो, नरेंद्र मोदी, भाजपा सरकार ह्यांच्याशी माझे काही मुद्द्यांबद्दल मतभेद आहेत ते राहणार. पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचं अभिनंदन देखील मी जाहीर करणार," असं राज भाषणात म्हणाले. "बाबरी मस्जिद पाडल्यानंतर या देशात राम मंदिर उभारलं जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं पण मतभेद असतील पण एक मान्यच करावं लागेल जर ह्या देशात कुणामुळे राम मंदिर उभारलं गेलं तर ते नरेंद्र मोदींमुळेच होऊ शकलं," असं म्हणत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं.

नक्की वाचा >> माझे अजित पवारांशी अनेक मतभेद असतील पण शरद पवारांसोबत असतानाही.. : राज ठाकरे

"आपले कारसेवक गेले होते त्या आंदोलनासाठी तेव्हा मुलायम सिंहाच्या सरकारने गोळ्या झाडून त्यांना मारलं. त्यांची प्रेतं शरयू नदीत फेकून दिली गेली. त्या माझ्या कारसेवकांच्या आत्म्याला या मंदिर उभारणीनंतर शांती मिळाली असेल," असंही राज म्हणाले.