शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल तर 'ही' लक्षणं दिसून येतील

हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणं हे शरीरात कॅल्शियमचं प्रमाण कमी असल्याची लक्षणं आहेत. जर, हा त्रास वाढत असेल तर आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

सतत मसल (स्नायू) क्रँप्स येणं सुद्धा कॅल्शियम कमी असल्याची लक्षणं आहेत.

वेळोवेळी पायाची बोटं, ओठ आणि जीभ यांसारख्या अवयवांना टाचणी टोचल्यासारखं जाणवत असेल तर, तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे.

कॅल्शियमचं प्रमाण कमी असल्याने स्नायू कमकुवत होऊन सतत थकवा जाणवतो.

नखं आणि दात कमकुवत होणं, तुटणं, नखांची वाढ योग्यप्रकारे न होणं आणि दात खराब होणं ही सर्व शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्याची लक्षणं आहेत.

हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होउन ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढू शकतो.

आहारात दूध, दही,पनीर, हिरव्या पालेभाज्या डाळ आणि मासे यांसारख्या पदार्थांचा समावेश केल्याने कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story