बॉलिवूड अभिनेत्री आणि स्टार क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनु्ष्का शर्माने 1 मे रोजी आपला वाढदिवस साजरा केला.

विराटने अनुष्काचा वाढदिवस अगदी थाटात साजरा केला. बंगळुरुतील LUPA रेस्टोरंटमध्ये त्यांना वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

रेस्टोरंटमधल्या चांगल्या मेन्यूबद्दल विराटने रेस्टोरंटचे शेफ मनु चंद्रा यांचे आभार मानले आहेत. आमच्या आयुष्यातील सर्वात चांगल्या खाद्य पदार्थांपैकी एक असं विराटने लिहिलंय.

अनुष्काच्या बर्थ डे पार्टित बॉलिवूडचा एकही कलाकार हजर नव्हता. पण विराटचे क्रिकेटर्स मित्र आपल्या जोडीदारांसह हजर होते.

या पार्टीत ग्लेन मॅक्सवेल आणि त्याची पत्नी विनी रमन आणि फाप डू प्लेसिस हजर होते. सर्वजण डिनर एन्जॉय करताना फोटोत दिसत आहेत.

अनुष्का शर्मा बी-टाऊन कार्यक्रम आणि पार्टमध्ये खूपच कमी दिसते. इतकंच काय तर तिच्या पार्टीतही बॉलिवूडचे कलाकार दिसत नाहीत.

दरम्यान, दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर अनुष्का शर्माचा पहिल्यांदाच फोटो समोर आला आहे. यात ती एकदम फिट दिसतेय.

VIEW ALL

Read Next Story