रोज मासे खाल्ल्यास शरिरात काय होतं? तज्ज्ञांनी यादीच वाचून दाखवली

माशात ओमेगा 3 फॅटी अॅसिड, विटॅमिन डी, विटॅमिन बी 2, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, जिंक, मॅग्नेशिअम, पोटॅशिअमसह अनेक मिनरल्स, विटॅमिन आहेत.   

May 16, 2024, 19:31 PM IST

माशात ओमेगा 3 फॅटी अॅसिड, विटॅमिन डी, विटॅमिन बी 2, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, जिंक, मॅग्नेशिअम, पोटॅशिअमसह अनेक मिनरल्स, विटॅमिन आहेत. 

 

1/13

मासा जगातील सर्वात हेल्दी मांसाहारी पदार्थांपैकी आहे. यामध्ये अनेक पोषकतत्वं असून, आरोग्याला अनेक फायदे मिळतात.   

2/13

माशात ओमेगा 3 फॅटी अॅसिड, विटॅमिन डी, विटॅमिन बी 2, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, जिंक, मॅग्नेशिअम, पोटॅशिअमसह अनेक मिनरल्स, विटॅमिन आहेत.   

3/13

काहींना रोज मासे खायला आवडतं, तर काहीजण ठराविक दिवशीच मासे खातात. पण जर रोज मासे खाल्ल्यास शरिरात नेमके काय बदल दिसतात याबद्दल तज्ज्ञांनी सांगितलं आहे.     

4/13

माशात ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं जे ह्रदयासाठी चांगलं असतं. हे खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकतं आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यात सुधारणा करतं.   

5/13

आपल्या शरिरात ओमेगा 3 फॅटी अॅसिड तयार होत नाही, त्यामुळे मासे ते मिळवण्यासाठी चांगला स्त्रोत आहे.   

6/13

ओमेगा 3 फॅटी अॅसिड ईपीए आणि डीएचए माशात आढळतात. हे मेंदूसाठी चांगले असतात.   

7/13

माशात विटॅमिन डी चांगल्या प्रमाणात असतं जे हाडांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं.   

8/13

माशात लीन प्रोटीन आढळतं जे टिश्यूज आणि मसल्सला रिपेअर करतं. वेट लॉस आणि मसल्स गेनला हे मदत करतं.   

9/13

माशात विटॅमिन बी असतं जे मेटबॉलिक एनर्जी आणि नर्व्स सिस्टमला प्रमोट करतं. याशिवाय काही माशांमध्ये सेलेनिमय असतं ते प्रतिकारशक्ती वाढवतं.   

10/13

एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार, किंग मॅकेरल, स्वोर्डफिश आणि टाइलफिश सारख्या काही माशांचं तापमान अधिक असतं. यांचं सेवन केल्यास नर्वस सिस्टम, कॉग्नेटिव्ह हेल्थसारख्या समस्या जाणवू शकतात.   

11/13

माशामध्ये सामान्यत: फॅट आणि कॅलरीज कमी असतात. पण काही माशांमध्ये फॅट अधिक असतं. त्यामुळे कॅलरी पाहूनच सेवन करा. काहींना मासे खाऊन एलर्जी होऊ शकते. जर त्वचेवर काही एलर्जी जाणवली तर ती माशामुळे असू शकते.   

12/13

तज्ज्ञांनुसार, आठवड्याला 226 ते 340 ग्रॅम माशाचं सेवन करु शकतो. प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांनी रोज मासे खाणं टाळावं.   

13/13

तुम्ही जर रोज मासे खाणार असाल तर एलर्जी, साईड इफेक्ट यांच्यापासून वाचण्यासाठी डॉक्टरांच्या संपर्कात राहा.