मजाच मजा! मनात येताच खरेदी करा Mahindra ची दमदार SUV

Mahindra Thar SUV : कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी. महिंद्राची 'ही' सर्वात लोकप्रिय एसयुव्ही खरेदी करण्याच्या विचारात आहात? महिंद्राच्या कारना तुमचीही पसंती असते का? 

May 17, 2024, 13:14 PM IST

Mahindra Thar SUV : ऑटो क्षेत्रामध्ये (Auto News) दर दिवशी नवी क्रांती होत असतानाच या शर्यतीमध्ये (Mahindra and Mahindra) महिंद्रा अँड महिंद्रासुद्धा मागे नाही. ग्राहकांना, कारप्रेमींना केंद्रस्थानी ठेवत याच महिंद्रा कंपनीनं एक कमाल निर्णय घेतला आहे. 

1/7

महिंद्रा अँड महिंद्रा

Auto news Mahindra Thar SUV waiting period in may features specifications

Mahindra Thar SUV : कार उत्पादन क्षेत्रामध्ये भारतीयांच्या अपेक्षा अचूकपणे ओळखत त्याच अपेक्षांच्या पूर्ततेसाठी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहानं कायमच पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. 

2/7

वाहन चालनाची एकंदर शैली

Auto news Mahindra Thar SUV waiting period in may features specifications

भारतीयांच्या वाहन चालनाची एकंदर शैली ओळखत त्यांना प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी म्हणून सातत्यानं प्रयत्नात असणाऱ्या या कंपनीकडून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांच्या कारच्या प्रत्येक मॉडेलमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. 

3/7

Auto news Mahindra Thar SUV waiting period in may features specifications

महिंद्रा कंपनीकडून कारप्रेमींसाठी एक मोठा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय घेण्यत आला आहे. ज्यामुळं येत्या काळात कार खरेदीचा बेत आखणाऱ्यांना कंपनीच्या या निर्णयाचा बराच फायदा होताना दिसणार आहे. कारण, कंपनी लवकरच एक नवं मॉडेल बाजारात आणत आहे.  

4/7

बुकिंग

Auto news Mahindra Thar SUV waiting period in may features specifications

सध्याच्या घडीला महिंद्राच्या थार एसयुव्हीला सर्वाधिक मागणी असून अद्याप या वाहनाचे 59000 युनिट्स ग्राहकांना मिळालेले नाहीत. यामध्ये थार 4x4 आणि थार RWD या दोन्ही मॉडेलचा समावेश आहे. प्रत्येक महिन्यात थारच्या सरासरी 7000 मॉडेलची बुकिंग होते. 

5/7

वेटिंग पिरियड

Auto news Mahindra Thar SUV waiting period in may features specifications

फेब्रुवारी महिन्यात या कारच्या युनिटमध्ये काहीशी घट पाहायला मिळाली. ज्यामुळं आता कारचा हा वेटिंग पिरियड 4 ते 6 आठवड्यांनी कमी होऊ शकतो. एप्रिलपर्यंत 4x4 थारसाठी 6 आठवडे ते 2 महिने इतका वेटिंग पिरियड होता. 

6/7

थार 5-डोर

Auto news Mahindra Thar SUV waiting period in may features specifications

लवकरच कारप्रेमींसमोर हजर होण्यासाठी सज्ज असणाऱ्या थार 5-डोरसाठी आता कारप्रेमींची उत्सुकता शिगेला असून, या कारवरही वेटिंग पिरियड असला तरीही त्यात काहीशी घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 'थार आर्मडा' असं या मॉडेलचं नाव असणार असून, पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही पर्यायांसह उपलब्ध असेल. 

7/7

संधी

Auto news Mahindra Thar SUV waiting period in may features specifications

येत्या काळात थारच्या या नव्या व्हर्जनला अधिक मागणी मिळणं अपेक्षित असून, त्यामुळं थारच्या 4x4 आणि थार 4WD चा वेटिंग पिरियड कमी होणं स्वाभाविक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून थार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही संधी हातची जाऊ देऊ नका.