अनैसर्गिक शरीरसंबंधांप्रकरणी युक्ताच्या पतीला जामिन?

माजी विश्वसुंदरी युक्ता मुखीच्या पतीची आज जामिनावर सुटका झाली आहे. याविरोधात युक्ता मुखीने मुंबई हायकोर्टात याचका दाखल केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 20, 2013, 07:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
माजी विश्वसुंदरी युक्ता मुखीच्या पतीची आज जामिनावर सुटका झाली आहे. याविरोधात युक्ता मुखीने मुंबई हायकोर्टात याचका दाखल केली आहे.
सोमवारी २३ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी करण्यात येणार आहे. ३ जुलै रोजी युक्ता मुखीने आपला पती प्रिंस तुली तसंच सासू- सासरे आणि नणंदांविरोधात पोलिसांकडे धाव घेतली होती. सासरची माणसं आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप युक्ता मुखीने केला होता. तसंच आपला पती आपल्यावर अनैसर्गिक शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप युक्ताने केला होता.
मारहाण, लैंगिक शोषण आणि अनैसर्गिक शरीरसंबंध असे आरोप असलेल्या प्रिंस तुलीची जामिनावर सुटका होत आहे. मात्र याविरोधात युक्ता मुखीने याचिका दाखल केली असून पतीला जामीन मिळू नये, यासाठी ती प्रयत्न करत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.