Raj Thackeray : नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंची तोफ धडकली, प्रचारसभेत केल्या 'या' 6 बेधडक मागण्या

Raj Thackeray Demands : शिवतीर्थावर विरोधकांचा समाचार घेत राज ठाकरे यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या काही मागण्या देखील केल्या.

सौरभ तळेकर | Updated: May 17, 2024, 09:15 PM IST
Raj Thackeray : नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंची तोफ धडकली, प्रचारसभेत केल्या 'या' 6 बेधडक मागण्या title=
Raj Thackeray 6 Demand narendra modi

Raj Thackeray On Shivaji Park : मुंबईमधील निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. येत्या 20 मे रोजी मुंबईतील मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्याआधी आता महाविकास आघाडी आणि महायुतीने सभेचा धडाका लावलाय. मुंबईत शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर आले. त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याआधी भाषण केलं. विरोधकांचा समाचार घेत राज ठाकरे यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या काही मागण्या देखील केल्या.

राज ठाकरेंच्या मागण्या काय?

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही जुनी मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी. 

जवळपास 125 वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं त्याचा इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा. 

शिवछत्रपतींची स्मारकं म्हणजे त्यांनी उभारलेले गडकिल्ले. या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समिती नेमून लक्ष द्यावं. 

देशात तुम्ही जसे उत्तम रस्ते बनवलेत, पण गेली 20वर्ष रखडलेला आमचा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून घ्यावा. 

काही मोहल्ल्यांमध्ये पोलीस घुसवून तिथे ज्या देशविघातक कारवाया सुरु आहेत, त्यावर कायमचा चाप बसवा.

मुंबई रेल्वेच्या विकासाकडे लक्ष द्या, रेल्वेच्या फेऱ्या वाढवा, प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून मुंबई रेल्वेला भरपूर निधी द्या.

तुम्ही तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास संविधान बदलणार अशी आवई विरोधकांनी उठवली आहे, त्यांना तुम्ही उत्तर दिलंच आहे. तुम्ही संविधान बदलणार नाही हे मला माहीत आहेच पण तुमच्याकडून पुन्हा एकदा देशाला आश्वस्त करा की भारतीय संविधानाला धक्का लागणार नाही, असंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, २०१४-२०१९ च्या मोदीजींच्या कार्यकाळाबद्दल मला जे बोलायचं होतं ते मी २०१९ ला बोललो. आता २०१९ ते आत्तापर्यँतचं बोलूया. इथल्या वक्त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करून वेळ वाया घालवला. माझ्या मते त्यांच्याबद्दल बोलून काही उपयोग नाही. कारण ते सत्तेत येणार नाही. पण २०१९ ते २०२४ काळात मोदीजींनी जी कामं केली त्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.