खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रक

Mumbai Central Railway News : मध्य रेल्वे सेवा साधारण 15 दिवसांसाठी खोळंबणार असल्याच्या सूचना रेल्वे प्रशासनानं दिल्या असून, रेल्वेच्या वेळापत्रकावर यामुळं परिणाम होताना दिसत आहे.   

सायली पाटील | Updated: May 17, 2024, 07:52 AM IST
खोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रक title=
Mumbai news central railway 15 days mega block many trains cancelled know latest update

Mumbai Central Railway News : रेल्वेचा मेगा ब्लॉक म्हटलं की अनेकदा प्रवाशांच्या चेहऱ्यावर चिंता पाहायला मिळते. ही चिंता आता पुन्हा वाढणार आहे. कारण, मध्य रेल्वेवर एकदोन नव्हे, तर तब्बल पंधरा दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. काही तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा थेट परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर होताना दिसणार आहे. प्राथमिक माहितीनुसार शुक्रवार 17 मे पासून शनिवार 1 जूनपर्यंत मध्य रेल्वे मार्गावर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

24 डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील 10 आणि 11 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्याशिवाय काही तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या काळात काही लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेल, दादर स्थानकांपर्यंत धावणार आहेत. ज्यामुळं लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना पुढील 15 दिवसांसाठी गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. 

उपनगरीय रेल्वे वाहतुकीवरही या ब्लॉकचा परिणाम होणार असून, सीएसएमटीहून मध्यरात्री 12.14 वाजचा कसारासाठीची शेवटची लोकल असेल. तर, कल्याणहून रात्री 10 वाजून 34 मिनिटांनी सीएसएमटीसाठीची शेवटची लोकल असेल. CSMT हून पहाटे 4.47 वाजता कर्जतसाठीची पहिली लोकल असेल. तर, ठाण्याहून पहाटे 4 वाजता सीएसएमटीसाठीची पहिली लोकल सुटेल. ब्लॉक वेळेत भायखळा ते सीएसएमटीदरम्यान लोकल धावणार नाहीत.

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : काळजी घ्या! ताशी 40 ते 50 किमी वेगाच्या वाऱ्यांसह राज्यात वादळी पावसाचा इशारा, 'इथं' यलो अलर्ट

प्रवाशांना होणारी गैरसोय पाहता रेल्वे प्रशासनानं ब्लॉकमुळं प्रभावित होणाऱ्या रेल्वेगाड्यांची यादी जाहीर केली असून, त्यानुसार प्रवासाची आखणी करण्याचं आवाहन प्रवाशांना करण्यात आलं आहे. 

दादरमध्ये अंशत: रद्द करण्यात येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस

- 12810 हावडा-सीएसएमटी मेल
- 12052 मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी
- 22120 तेजस-सीएसएमटी तेजस
- 12134 मंगलोर-सीएसएमटी
- 12702 हैद्रराबाद-सीएसएमटी हुसैन सागर
- 12810 हावडा-सीएसएमटी
- 22224 साईनगर शिर्डी – सीएसएमटी वंदे भारत
- 12533 लखनऊ-सीएसएमटी पुष्पक
- 11058 अमृतसर-सीएसएमटी
- 11020 भुवनेश्वर-मुंबई कोणार्क

दादरहून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या

- 11057 सीएसएमटी-अमृतसर
- 22177 सीएसएमटी-वाराणसी महानगरी
- 12051 सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी
- 22229 सीएसएमटी-मडगाव वंदे भारत
- 22157 सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट