लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ दावा

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसोबत समझोता झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.  प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 14, 2024, 10:38 PM IST
लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ दावा title=

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसोबत समझोता झाल्याचा दावा, प्रकाश आंबेडकरांनी केलाय. कल्याण लोकसभेत उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार खरंच लढणारा आहे का, असा सवालही आंबेडकरांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका, असंही ते म्हणाले. 

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार हा खरंच लढणारा आहे का?  एकनाथ शिंदे सोबत समझोता करून झालेला असून लोकसभा निवडणूक नंतर हे दोघे एकत्र आले तर आश्चर्य मानू नका.  चर्चा चालू झाली आहे असा खळबळ जनक आरोप आरोप प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत करणार त्यामुळे हे फसवा फसवी चे राजकारण सुरू आहे असं आंबेडकर पुढे म्हणाले. कल्याण लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर उल्हासनगर मध्ये आले होते

शिर्डीमध्ये लोखंडे, वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीतील लढतीत कोण बाजी मारणार?

शिर्डीमध्ये लोखंडे, वाकचौरे आणि वंचित बहुजन आघाडीतील लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचच लक्ष लागलंय... लोखंडे म्हणतात वाकचौरे खुडुक कोंबडी, तर वाकचौरे म्हणतात मी अंडे देणारी कोंबडी मात्र वंचितच्या रूपवतेंनी कोंबडी असो की अंडे ते आम्ही प्रेशर कुकरमध्येच शिजवणार असं म्हणत विरोधकांना आपल्या विजयाचा विश्वास बोलून दाखवलाय.  

उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल 

देशातल्या जनतेने आता ठरवलंय की दिल्लीतलं इंजिन बदलायचं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय. तसंच नकली शिवसेना म्हणणा-यांना बेअकली म्हणत ठाकरेंनी टोलाही लगावलाय.. शिवसना ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारती कामडींसाठी उद्धव ठाकरेंनी वसईत सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला..

राज ठाकरे आणि सुषमा अंधारे यांच्यात 'व्हिडिओ वॉर' 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात 'व्हिडिओ वॉर' सुरू झालंय... ठाण्यातील सभेत अंधारेंचा व्हिडिओ लावून राज ठाकरेंनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. बाळासाहेबांवर टीका करणारी बाई पक्षाची उपनेता कशी झाली, असा सवाल राज यांनी केला... आता सुषमा अंधारेंनीही भरसभेत राज ठाकरेंचे जुने व्हिडिओ लावून जोरदार पलटवार केलाय.. मोदी-शाहांवर टीका करणारे राज ठाकरेंचे व्हिडिओ त्यांनी सभेत ऐकवले...