कुकरच्या शिट्टीतून डाळीचे पाणी फसफसून बाहेर येते?, या टिप्स वापरा किचन राहिल स्वच्छ

Mistakes While Cooking Dal In Cooker: डाळ कुकरमध्ये शिजवताना कधी कधी पाणी बाहेर येते. त्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 15, 2024, 12:34 PM IST
कुकरच्या शिट्टीतून डाळीचे पाणी फसफसून बाहेर येते?, या टिप्स वापरा किचन राहिल स्वच्छ  title=
kitchen hacks in marathi Mistakes to avoid when cooking daal

Mistakes While Cooking Dal In Cooker: डाळ आणि भात हे भारतीयांचे मुख्य अन्न आहे. अनेकांना तर डाळ आणि भाताशिवाय जेवणच जात नाही. त्याचबरोबर डाळ भात हे पूर्ण अन्नदेखील मानलं जातं. भारतात प्रत्येक प्रदेशानुसार डाळ बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तसंच, शाकाहरी लोकांसाठी डाळ प्रोटीनपेक्षा काही कमी नाहीये. डाळीत प्रोटीनव्यतिरिक्त झिंक, कॅल्शियम, प्रोटीन-फोलेट याची योग्य मात्रा आढळते. डाळ प्रामुख्याने कुकरमध्येच शिजवली जाते. मात्र, अनेकदा डाळीचे पाणी कुकरमधून बाहेर येते. त्यामुळं कुकरचे झाकण तर खराब होतेच मात्र डाळदेखील चांगली शिजत नाही. तुम्हाला देखील याचा सामना करावा लागतोय. तर, आजचं जाणून घ्या डाळ कुकरला लावण्याची योग्य पद्धत. 

कुकरला डाळ शिजण्यासाठी लावल्यानंतर जेव्हा शिट्टी होते तेव्हा त्याबरोबरच डाळीतील पाणीदेखील बाहेर येते. या मुळं डाळदेखील नीट शिजत नाही आणि कुकरदेखील घाण होतो व किचनदेखील घाण होते. त्यामुळं कुकरमध्ये डाळ शिजवताना या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. 

कुकरमधून डाळ बाहेर येण्याचे कारण 

- जेव्हा तुम्ही कुकरमध्ये डाळ शिजवता तेव्हा भांड्यात अधिक डाळ टाकू नका. जेव्हा डाळ जास्त होते तेव्हा असं होतं. 

- त्याबरोबर कुकरमध्ये पाणी जास्त झाले तर डाळ पाण्यात मिक्स होऊन जाते आणि शिट्टीबरोबर पाणी बाहेर येते. 

- मोठ्या आचेवर डाळ शिजवल्यासदेखील असं होऊ शकते. 

काय काळजी घ्याल

- कुकरमध्ये डाळ शिजवण्याच्या आधी गरम पाण्यात 15 मिनिटे आधी डाळ भिजत ठेवा. जेव्हा तुम्ही कुकरमध्ये डाळ टाकाल तेव्हा गरजेपुरतेच पाणी घ्या. 

- डाळ नेहमी मध्यम आचेवर शिजवा नाहीतर डाळ करपण्याची शक्यता अधिक असते. 

- कुकरमध्ये प्रेशर नीट तयार झालं नाही तर डाळ करपण्याची शक्यता असते. 

कुकरमध्ये डाळ कधी शिजत नाही?

कुकरचा रबर सैल झाला असेल तर शिट्टी नीट होत नाही. त्यामुळं कुकरमध्ये प्रेशन नीट बनत नाही आणि डाळ नीट शिजत नाही. 

ज्या डाळींना कुकरमध्ये शिजण्यासाठी वेळ लागतो त्या डाळी तुम्ही साधारण एक तास आधीच भिजत ठेवा. किंवा डाळ शिजत ठेवताना त्यात चिमूटभर खाण्याचा सोडा मिसळू शकता. 

डाळ शिजवताना त्यात मीठ, हळज आणि थोडे तेल किंवा तूप टाका. त्यामुळं डाळ लवकर शिजेल आणि तेल टाकल्यामुळं कुकरमध्ये चिटकणार देखील नाही.