दिवसाला किती आंबे खाऊ शकतो? तज्ज्ञ म्हणतात...

Mango Side Effects: आंबा खाण्याचे जसे फायदे आहेत तसे काही नुकसानदेखील आहे. दिवसातून किती आंबे खावेत? हे जाणून घेऊया.   

मानसी क्षीरसागर | Updated: May 14, 2024, 04:57 PM IST
दिवसाला किती आंबे खाऊ शकतो? तज्ज्ञ म्हणतात...  title=
Eating Too Many Mangoes In Summer Can Cause These Side Effects

Mango Side Effects: आंबा खाणं कोणाला आवडत नाही. मार्चपासून बाजारात आंब्याची आवक सुरू होते. मात्र, आंबे खऱ्या अर्थाने खायला मिळतात ते एप्रिलपासून. उन्हाळ्याच्या दिवसांतच आंबे बाजारात दिसू लागतात. फळांचा राजा असलेला आंबा पाहताच सर्व त्याच्यावर तुटून पडतात. लहान मुलं तर सकाळ-दुपार-संध्याकाळ आंब्यांवर ताव मारतात.या दिवसांत आंब्याचा मनसोक्त आनंद लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच घेत असतात. आंबा खाणे आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. मात्र, उन्हाळ्यात अतिप्रमाणात आंबा खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसान होईल. कडक उन्हाळा असताना किती आंबे खावे? व अतिप्रमाणात आंबे खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकते याची सविस्तर माहिती जाणून घ्या. 

आंब्याचा गुणधर्म हा गरम असतो. त्यामुळं अतिप्रमाणात आंबे खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. वातावरणात आधीच उष्णता असल्यामुळं अधिक गरम पदार्थ खाणे, आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. त्यामुळं तुम्हाला आंबे कितीही आवडत असतील तर दररोज प्रमाणातच आंबे खा. एका दिवसांत किती आंबे खावे, हे जाणून घ्या. व अतिप्रमाणात आंबे खाण्याचे नुकसानदेखील जाणून घ्या. 

पोटाच्या समस्या

 जास्त प्रमाणात आंब्याचे सेवन केल्यास पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जसं की, अपचन, गॅस, पोटदुखी. आंब्यामध्ये जास्त प्रमाणात शुगर असते ज्यामुळं पोटाचे नुकसान होऊ शकते. 

वजन वाढते

आंब्यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरी असते. जास्त प्रणाणात आंबे खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आंबे अतिप्रमाणात खाऊ नका. 

अॅलर्जीचा धोका

ज्या लोकांना अॅलर्जीचा धोका असतो त्यांनी जास्त प्रमाणात आंब्याचे सेवन केल्यास अॅलर्जिक समस्या वाढू शकतो. 

शुगर लेव्हल वाढू शकते

आंब्यामध्ये जास्त प्रमाणात शुगर असते. त्यामुळं ज्यांना मधुमेह आहे त्या रुग्णांना थोडं बेतानेच आंब्याचे सेवन करावे. 

दिवसातून किती आंबे खावेत?

आता प्रश्न हा आहे की, दिवसातून किती आंबे खावेत. सामान्यतः एका व्यक्तीला दिवसातून एक किंवा दोन आंब्यांचे सेवन करणे सुरक्षित मानले जाते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)