आयपीएल 2024 मध्ये ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही.

दिल्ली कॅपिटल्सला 14 सामन्यात सात सामने जिंकता आले.पण दिल्ली प्ले ऑफमध्ये प्रवेश करु शकली नाही

दिल्लीची कामगिरी चांगली झाली नसली तर कर्णधार ऋषभ पंतने दमदार कामगिरी केली. पंतने 13 सामन्यात 446 धावा केल्या.

आता ऋषभ पंतचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका चाहत्याच्या वाढदिवसाला पंतने आपली अमुल्य वस्तू त्याला गिफ्ट केली.

पंतने आपल्या आपल्या हातातलं ब्रेसलेट त्या चाहत्याला दिलं. यामुळे या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

ऋषभ पंतने वेळात वेळ काढून चाहत्याचा वाढदिवस साजरा केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी पंतचं कौतुक केलं आहे.

जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठीच्या टीम इंडियात ऋषभ पंतचा समावेश आहे. भारतीय संघात पंत विकेटकिपर आणि फलंदाज अशी दुहेरी भूमिका बजावणार आहे.

VIEW ALL

Read Next Story